
#ग्रा.पं.सदस्य(शेतकरी) प्रसाद पाटील!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
बेळगांव व्हाया देसुर मार्गे गर्लगुंजी ,के के कोप ,कित्तूर ,धारवाड अशी रेल्वे धावणार आहे.
यासंदर्भात संबधीत खात्याच्या (के आय ए.डी. बी. ) ने शेतकऱ्यांना नोटीस पाठविलेल्या होत्या त्यावर शेतकऱ्यांनी (के. आय.ए. डी.बी.)ऑफिसला जाऊन आपला विरोध नोंदविला होता.नंतर दुसऱ्या वेळी बेळगाव येथे विरोध नोंदविला.आणि कितीतरी वेळा अधिकाऱ्यांना विरोध करून शेतकऱ्यांनी अधिकार्याना वापस पाठविले,
रेल्वे अधिकारी थोडी शी जमीन पूर्ण प्रोजेक्ट साठी घेतली जाणार म्हणून सांगत होते आता फक्त बेळगाव जिल्ह्यातुन १२०० एकर जमीन अधिग्रहित केली जाणार. यावरून शेतकऱ्याला पूर्णपणे संपवण्याचा हा डाव आहे.अंगडी चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांचे जीवन संपवण्याचा हा प्रकार आहे.
असे मत गर्लगुंजी ग्राम पंचायत सदस्य (शेतकरी) प्रसाद पाटील यानी पत्रकाराशी बोलताना सांगीतले.
ते म्हणाले की ,आम्ही या प्रोजेक्टला विरोध पहिला पण केला नव्हता. आता पण नाही. फक्त सुपीक जमीन.वाचवून खडकाळ नापीक जमिनीतून मार्ग घ्या. अशी आमची मागणी होती.पण अंगडी आणि शेट्टर यांच्या वैयक्तिक स्वार्थापायी सर्व अधिकाऱ्यावर दबाव घातला जात आहे.शेतकऱ्यांची बाजू ऐकली गेली असती तर ६ किलोमीटर अंतर कमी झाल असत. आणि सुपीक जमिनी वाचल्या असत्या सरकारचे २०० ते २५० कोटी रूपये वाचले असते.तेवढंच होत तर लोंढा मिरज मार्गाला हजार कोटी पेक्षा जास्त का खर्च केला गेला याच उत्तर सरकारने द्यावे.तिथं अवाढव्य पैसे खर्च आणि इथ ही खर्च यावरून सरकारची मानसिकता समजते.
या मार्गात नागिरहाळ ते के.के. कोप्प, येथेच रेल्वे स्टेशन का.? गर्लगुंजी येथे स्टेशन करावे म्हणजे खासदार यांचा काय स्वार्थ आहे सर्वांना समजेल. तिकड रिंग रोड, कळसा भांडूरा हे सगळ करताना भारत सारख्या कृषी प्रधान देशात शेतकऱ्यांना देशोधडीला लावले जात आहे
यावर .आम्ही सर्व शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांना दोन दिवसात भेटून चर्चा करणार असल्याचे ग्राम पंचायत सदस्य (शेतकरी) प्रसाद पाटील यांनी सांगीतले.