
#आज महाप्रसादाचे आयोजन!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
गर्लगुंजी ( ता.खानापूर ) गावचे ग्रामदैवत श्री माऊली देवीची यात्रा सालाबाद प्रमाणे यंदा ही मंगळवारी दि. २९ एप्रिल ते २ मे पर्यत होत आहे.
मंगळवारी दि २९ रोजी यात्रेचा पहिला दिवस असुन मंगळवारी सकाळी गावातील देवदेवतांची विधीवत पुजा होऊन सायंकाळी गावातुन पालखी वाजत गाजत माऊली मंदिराकडे प्रस्थान झाली. त्यानंतर ग्रामदेवता माऊली देवीची विधीवत पुजाआर्चा होऊन गार्हाणे घालण्यात आले.
#आज यात्रेचा मुख्य दिवस !
बुधवारी यात्रेचा मुख्य दिवस आहे. यादिवशी पहाटे मानकर्याच्या घरातून सुवासिनी वाद्याच्या निनादात आरती घेऊन माऊली मंदिराकडे प्रस्थान होतील. यावेळी माऊली देवीला अभिषेक ,विधीवत पुजा होेऊन सुवासिनी कडुन आरती होऊन इंगळ्याचा कार्यक्रम होणार . त्यानंतर महाप्रसादाला प्रारंभ होणार आहे. रात्री गावात मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे.
गुरूवारी रात्री भाविकासाठी नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात येणार आहे.
तर शुक्रवारी यात्रेचा शेवटचा दिवस यादिवशी सायंकाळी ग्राम देवता माऊली मंदिरात देवी ची विधिवत पुजा करून पालखी वाद्याच्या निनादात वाजत गाजत गावाकडे प्रस्थान होऊन यात्रेची सांगता होणार आहे.