
#कौलापूरवाडा व गणेबैल मराठी शाळेत ३१ वर्षे शिक्षिका सेवा!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर (सुहास पाटील )
गणेबैल ( ता. खानापूर ) येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ.वाय.एन.कुगजी या ३१ वर्षाच्या प्रदीर्घ शिक्षकी सेवेतुन ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाल्या त्यानिमित्त त्यांच्या सत्कार सोहळा बुधवारी दि.११ रोजी सत्कार सोहळा संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त शिक्षक बी बी पाटील होते.व्यासपिठावर सत्कारमुर्ती सौ.वाय.एन.कुगजी, विठ्ठल मोरे, माजी जिल्हा पंचायत सदस्य व समितीनेते विलास बेळगांवकर,सामाजिक कार्यकर्ते भैरू पाटील,सुब्राव पवार,दता पवार, शिक्षण संयोजिका किर्ती पाटील,सीआरपी सौ. रूपाली कोळी, सौ.अंजना देसाई, पी.जी.पाखरे,बसवंत पवार,मधू पाटील, आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक ए बी मुरगोड यानी केले.
उपस्थित पाहुण्याच्याहस्ते दीपप्रज्वलन व फोटो पुजन करण्यात आले.
सत्कार मुर्ती सौ वाय एन कुगजी या दापत्यांचा शाळेच्यावतीने तसेच विविध शाळा मुख्याध्यापकांच्यावतीने, मित्रपरिवार व आप्तेष्टांच्यावतीने शाल,पुष्पहार व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे विलास बेळगावंकर,भैरू पाटील (कौलापूरवाडा),मधु पाटील, एम एस चौगुले, मुख्याध्यापक एस टी पाटील, अध्यक्ष बी बी पाटील आदीनी सत्कारमुर्तीच्या कार्याबद्दल कौतुक केले.
यावेळी सत्काराला उत्तर देताना सौ वाय.एन.कुगजी म्हणाल्या की माजी शिकी सेवेची सुरूवात कौलापूरवाडा मराठी शाळेतुन झाली गेली २४ वर्षे याशाळेत सेवा बजावली.या शाळेत अनेक चांगले वाईट अनुभव मिळाले. विद्यार्थ्याच्या प्रगतीसाठी मी सतत प्रयत्न केले. त्यामुळे माझे अनेक विद्यार्थी इंजिनिअर ,डाॅक्टर तसेच उच्च पदावर कार्यरत आहेत.याचा मला अभिमान वाटतो.त्यानंतर माजी बदली गणेबैल मराठी शाळेत झाली. तेथून मी निवृत्त झाले.
असे विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बी बी चापगावकर व मोहन पाटील यानी केले .आभार श्री पवार यानी मानले.