
#वनखाते करते दुर्लक्ष!
खानापू प्रतिनिधी
खानापूर तालुक्यात ऐन सुगीच्या काळात कुणकीकोप,नजीलकोडल,सागरेसह चापगांव ,जळगे पर्यत हत्तीची मजल गेली.
अनेक शेतकर्याच्या ऊस पिकाचे तसेच भात पिकाचे प्रचंड नुकसान केले.त्यामुळे शेतकरीवर्ग चिंतेत सापडले.
भात कापून मळण्या करी पर्यत हत्ती पुन्हा धास्तावेल याचा नेम नाही. ऊसाचे पिक आगदी तोडांवर आले आहे.गळीत हंगामाला कुठे सुरूवात होते ना होते .त्यातच हत्तीने प्रवेश केला. त्यामुळे हत्तीकडुन ऊस पिकाचे नुकसान झाले. ऊसाचे गाळप मार्च पर्यत चालणार तो पर्यत हत्ती केव्हा दत्त होईल हे सांगता येणार नाही.
यासाठी खानापूर तालुका काॅग्रेस अध्यक्ष
अँड ईश्वर घाडी यानी बोलताना सांगीतले की , वनखाते शेतकर्याच्या जीवावर उठले आहे. हत्तीकडुन लाखो रूपयाचे नुकसान होत आहे.याची काळजी नाही.तर जंगलभागातील शेतकर्यानी शेतीच्या आवजारासाठी एक लाकुड आणले .अथवा जळणासाठी लाकडे आणली तर त्या शेतकर्यावर केस दाखल करतात.हा वनखात्याचा अन्याय शेतकरी सहन करत आहेत.
याबद्दल कोणीही आवाज उठविला नाही. तो केवळ माजी आमदार व अखील भारतीय काॅग्रेस कमिटीच्या कार्यदर्शी डाॅ.अंजली निंंबाळकर यानी उठविला. असे मत खानापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष अँड ईश्वर घाडी यानी बोलुन दाखविले.