
#एच ई आर एफ टीम प्रमुखानी कॅमेराव्दारे मृतदेहाचा शोध!तर रिस्क्यू टीमच्या सदस्यांनी मृत्यूदेह काढला बाहेर!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
मण्णूर ( ता .खानापूर ) चौगुले कुटूंब हे पडली भरण्याच्या देवकार्यासाठी रविवारी दि २६ जानेवारी रोजी खानापूर शहरातील मलप्रभा नदीच्या घाटावर सकाळी आले होते.
मलप्रभा नदी घाटाजवळील बंधार्याजवळ पाणी भरपूर आहे. मण्णूरचा युवक समर्थ मल्लापा चौगुले ( वय.२३) हा पोहण्यासाठी बंधार्याजवळील मलप्रभा नदीच्या पात्रात उतरला. मात्र त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने नदीच्या पात्रात बुडाला.
ही बातमी चौगुले कुंटूबाला समजताच समर्थच्या आईन हंबरडा फोडला. लागलीच अग्नीशामक दलाच्या जवानाना पाचारण करण्यात आले.
लागलीच जवानानी मलप्रभा नदीच्या पात्रात शोधकार्य सुरू केले.
यावेळी अग्निशामक दलाचे अधिकारी श्री राठोड यानी अग्नीशामक दलाच्या जवानाना मार्गदर्शन करून मृत्यूदेह शोधकार्यासह मदत करत होते.
यावेळी खानापूर पोलिस स्थानकाचे सीपीआय लालसाहेब गंवडी व पीएसआय श्री बिरादार आपल्या पोलिस फाट्यासह मलप्रभानदीवर हजर होते.
यावेळी खानापूर शहरासह तालुक्यातील नागरीकानी मलप्रभा नदीवर बघ्या गर्दी केली होती .मृतदेह शोधण्याचे कार्य उशीरा पर्यत चालु होते.
रविवारी सायंकाळी पाच वाजता एच ई आर एफ टीमचे प्रमुख बसवराज दुंडय्या हिरेमठ यानी कॅमेराव्दारे मशीनच्या सहाय्याने सहकार्यानी मृतदेह असलेल्या जागेचे लोकेशन दाखवुन रिस्क्यू टीमच्या सदस्यांनी मृतदेह बाहेर काढला. लागलीच पोलिसानी पंचनामा करून सरकारी दवाखान्यात मृतदेह उत्तरीय तपासणी करून मृतदेह नांतेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
समर्थ हा चौगुले कुटूंबाचा एकुलत एक मुलगा. मागील वर्षीच वडीलाचे निधन झाले होते. तर त्याचे भावाचे निधन झाले होते.
त्यामुळे आईला समर्थ हा एकच आधार होता. त्यामुळे समर्थच्या आईचा आक्रोश मन हेलकावुन टाकणारा होता.