
#डी सी ना घेराव ! पत्रकारानी मागीतला न्याय!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
कर्नाटक राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबद्दल गुरूवारी दि.१९ रोजी भाजपचे एम एल सी सी टी रवी यानी आपमानस्पद भाषा वापरल्या प्रकरणी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यानी हिरेबागेवाडी पोलिस्थानकात तक्रार दाखल केली.
यावेळी पोलिसानी एम एल सी सी टी रवी याच्या विरोध्दात आपमानास्पद भाषा वापरल्याबदल एफ आर आय नोंदवुन रात्री आठ वाजता एमएलसी सी टी रवी याना खानापूर पोलिस स्थानकात दाखल करण्यात आले.
खानापूर पोलिस स्थानकात भाजपचे एम एल सी सी टी रवी दाखल होताच पोलिसानी पत्रकाराना वाईट वागणुक देऊन त्याच्यावर हल्ला केला.छायाचित्रकाराच्या कॅमेर्याची मोडतोड करून .रात्री उशीरा पर्यत खानापूर पोलिस स्थानकात एकच गोंधळ निर्माण केला.
या संदर्भात बेळगाव जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने बेळगावा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढुन जिल्हा अधिकारी महमद रोशन याना निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, ज्या पोलिस अधिकार्यानी पत्रकारावर हल्ला करून त्याना त्रास दिला.काहीना जखमी केले. त्याचा शोध घेऊन त्याना त्याना त्वरीत निलंबीत करावे .अशी मागणी निवेदनाव्दारे केली.
यावेळी जिल्हाधिकारी महमद रोशन निवेदनचा स्विकार करून पोलिस अधिकार्याशी चर्चा करूण योग्य तो निर्णय घेऊ असे अश्वासन दिले.