
तालुका क्षत्रिय मराठा परिषदेच्यावतीने सत्कार!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर (सुहास पाटील )
खानापूर तालुका ब्लाॅक काॅग्रेसच्या ग्रामीण अध्यक्षपदी अँड ईश्वर घाडी याची निवड करण्यात आली. त्याबद्दल खानापूर तालुका क्षत्रिय मराठा परिषदेच्यावतीने सत्कार नुकताच करण्यात आला.j
तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची सेवा पाहुन माजी आमदार डाॅ.अंजली निबाळकर यानी आपल्या हाय कमांडकडे प्रस्ताव पाठविला .व त्याच्या निवडीची शिफारस केली. त्यामुळे खानापूर तालुका ब्लाॅक काॅग्रेसच्या अध्यक्षपदी अँड.ईश्वर घाडी याची निवड झाली .
अशा कर्तबगार नेत्याचा खानापूर तालुका क्षत्रिय मराठा परिषदेच्यावतीने परिषदेचे बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पवार यांच्याहस्ते शाल,पुष्पहार व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना म्हणाले की तालुक्यात काॅग्रेस पक्षाचा वडवृक्ष करण्यासाठी मी प्रयत्न करीन,तालुक्यात मोठ मोठे उधोग आणण्यासाठी व हुशार पदवीधराना नोकरीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले. ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याची ग्वाही दिली.
या सत्कार प्रसंगी खानापूर तालुका ग्राम पंचायत सदस्य संघटना अध्यक्ष व निलावडे ग्राम पंचायतीचे सदस्य विनायक मुतगेकर, एस एन बेडरे,प्रकाश पाटील विद्यानंगर,सुनिल पाटील युवा नेता,सुरज होवेकर उपाध्यक्ष परिट समाज ,रमेश पाटील सचीव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.