
#गोव्याच्या मुख्यमंत्र्याची,खासदार कागेरीची अनुपस्थिती!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
चिखले ( ता. खानापूर ) गावचे ग्रामदैवत श्री सातेरी केळबाय देवी व प्रभू श्री रामलक्ष्मण,सीता ,हनुमान आणि पाषाणरूपी देवी देवतांची प्राणप्रतिष्ठापणा व लोकार्पण सोहळा शनिवारी दि.१० मे रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी चिखले गावचे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बाबली गावडे (व्यवसायीक पूणे) प्रास्ताविक करून उपस्थिताचे स्वागत केले .
यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर,माजी आमदार अरविंद पाटील,भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी,अमृतलाल परिहार ,भाजप राज्य कार्यकरणी सदस्या धनश्री सरदेसाई, सौ रूक्मिणी हलगेकर,समितीचे नेते विलास बेळगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.तसेच देवस्थान कमिटीचे अध्यक्ष दत्ताराम पाटील, उपाध्यक्ष सोमन गावडे,अंकुश पाटील ,बारकू गावडे,माजी ग्राम पंचायत सदस्य आप्पाना गावडे,गुंडू गावडे,धाना चौगुले ,श्रीकांत हरिजन आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्याहस्ते नुतन मंदिराचे फित कापून लोकार्पण करण्यात आले.
चिखले गावात गावकर्याच्या वर्गणीतुन तसेच मदतीतुन जवळपास दीड कोटीचे नुतन मंदिर उभारण्यात आले आहे.
गावच्या माहेरवासीनीकडुन १० लाख रूपयाची मदत केली आहे.
गावातील नोकरवर्ग बाहेर गावी नोकरीच्या निमित्ताने असलेल्यानी ही लाखो रूपयाची मदत देऊ केली आहे.
मंदिर उभारताना गावकर्यानी श्रमदानातुन मदत केली आहे.त्यामुळे आज कोट्यावधी रूपयाचे मंदिर उभारण्यात आले आहे.
मंदिराच्या उद्घाटनाला गोव्याचे मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत व सौ.सुलोक्षणा सावंत भाजप महिला मोर्चा प्रभारी गोवा,खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी, यांची अनुपस्थिती दिसुन आली.
आमदार विठ्ठल हलगेकर,माजी आमदार अरविंद पाटील ,भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी,अमृतलाल परिहार ,हाॅटेल व्यवसायिक प्रकाश गावडे,आदी मान्यवराची भाषणे झाली.
यावेळी उदघाटन सोहळ्याला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. सर्वानी महाप्रसादाचा लाभ घेतला.