
#करंबळजवळ झाड पडुन वहातुक ठप्प!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्याच्या चापगांव,नंदगड ,बेकवाड भागात सोमवारी दि १२ रोजी सायंकाळी वीजेच्या गडगडाटासह जोराच्या पावसाला प्रारंभ झाला.
यावेळी चापगाव परिसरातील माणीतील तलाव परीसरात हंपन्नावर यांच्या शिवारात होन्नूर(ता.बैलहोगल) गावच्या उमेश यल्लाप्पा चिचडी या धनगराच्या कळपातील ११ बकर्याचा वीज पडुन बळी गेला. त्यामुळे त्या धनगराचे लाख ते दीड रूपयाचे नुकसान झाले.
त्याचबरोबर याच परिसरात ग्राम पंचायतीचे माजी अध्यक्ष मारूती चोपडे यांच्या शाडू खाण जवळील बंगल्यावर वीजेचा धक्का बसुन घरातील फॅन ,संपूर्ण लाईट,व इन्व्हर्टर आदी वस्तू जळून गेल्या आहेत.त्यामुळे त्याचे लाखाचे नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच नंदगड पोलिसस्थानकाच्या पोलिसानी घटनास्थळी धाव घेऊण पंचनामा केला.