
#अतिवृष्टीमुळे कोसळलेल्या घराना अनुदान द्या!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
चापगांव ( ता. खानापूर ) येथील शिवाजी नागो ठाकर याचे आगष्ट महिण्यात अतिवृष्टीमुळे घर कोसळुन नुकसान झाले .
याबाबत संबधीत तहसीलदार कार्यालयाचे अधिकारी ,अभियंते, आदीनी भेट देऊन पाहणी केली.
तरी आज तागायत सदर घराच्या पुनर्रबांधणीसाठी अद्याप अनुदान मंजुर झाले नाही.
सदर मोडकळलेल्या घरात राहत नसल्याने घर नुकसान भरपाई योजनेतुन कमी केले आहे.माझे कुुटूंब गरीब असुन मजुरी करून उदरनिर्वाह करतो.राहण्यासाठी दुसरे घर नाही . तेव्हा संबधित अधिकार्यानी घराची सखोल चौकशी अनुदान मंजुर करावे.अशी मागणी मोर्चाच्यावेळी शिवाजी ठाकर यानी केले आहे.
जोपर्यत मला न्याय मिळत तो पर्यत चापगाव ग्राम पंचायतीच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषनाला बसुन राहणार आहे.असे सांगीतले.
यावेळी चापगांव गावातील अनेक अर्जदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.