
#शेतकर्यांचे नुकसान !
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील यडोगा ,चपगांव परीसरात मलप्रभा नदीकाठावरील असलेल्या पंपसेट्च्या केबलची चोरी सातत्याने होत असतात. त्यामुळे शेतकर्याचे आर्थिक नुकसान होत आहे.
अशाच प्रकारे शनिवारी रात्री यडोगा चापगांव परिसरात मलप्रभानदीच्या काठावर असलेल्या अनेक पंपसेटच्या केबलची चोरी होत असताना सतर्कतेने शेतकर्यानी चोरट्यांचा पाठलाग केल्यामुळे चोरट्यानी पोबारा केला.
यापूर्वी ही चोरट्यानी पंपसेटच्या केबल व मोटारी चोरीचा प्रकार केला आहे. त्यामुळे शेतकर्यानी रात्रीची गस्त ठेवुन शनिवारी रात्री च्यावेळी बंधार्याच्या जवळ शेतकर्याची मोटर, केबल तोडुन गोळा करून ठेवल्याचे दृष्टीस पडले. त्यामुळे लागलीच परिसरातील दुसर्या मोटर केबलची पाहणी केली असता तेथेही मोटर केबलची चोरी करून तोडुन ठेवली होती.
त्यापरिसरात जवळपास १५ ते २० मोटरा़ंच्या केबल त्या ठिकाणी चोरून ठेवल्याचे दिसुन आले. तेवढ्यात यडोगा ,चापगाव गावच्या शेतकर्यानी एकत्रीत येऊन चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला .पण चोरट्याला सुगावा लागताच तेथून चोरट्याने पोबारा केला .
मात्र शेेतकर्याचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.