
#नुकसान भरपाई देण्याची मागणी!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
मणतुर्गा ( ता.खानापूर ) येथील घराला शुक्रवारी दि. २५ रोजी अचानक आग लागुन प्रचंड नुकसान झाल्याची घटना घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मणतुर्गा ( ता.खानापूर ) येथील रहिवाशी तुकाराम परशराम देवलतकर हे आपले जुनं घर पाडवुन त्याच ठिकाणी नविन इमार उभी करत आहेत.त्यामुळे देवलतकर कुटूंब सध्या बाजुलाच पत्र्याचे शेड उभारून मुक्काम करत होते.
नेहमीप्रमाणे शुक्रवारी देवलतकर कुटूंब नविन इमारती्च्या बांधकामात मग्न होते. मात्र पत्र्याचे शेडमध्ये असलेल्या घरातील चुलीतील आगीची किट उडुन जवळ असलेल्या पलंगावरील चादरीवर पडली. काही वेळेतच आगीने पेट घेतला .त्यामुळे घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य ,कपडे,टीव्ही,किमती ऐवज असे जवळ पास लाखाचे नुकसान झाले .
घटनेची माहिती मिळताच मणतुर्गा गावचे तलाठी,ग्राम पंचायतीचे पीडीओ यानी घटना स्थळी भेट देऊण पंचनामा केला. व नुकसान भरपाई मिळवुन देण्याची ग्वाही दिली.
अचानक आग लागुन देवलतकर कुटूंबाचे आर्थिक नुकसान झाल्याने ग्रामस्थातुन हळहळ व्यक्त होत होती.