
#आम.विठ्ठलराव हलगेकर यांच्याहस्ते कुदळ मारून कामाचा शुभारंभ!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
सिंगीनकोप ( ता.खानापूर )येथील पूर्व प्राथमिक मराठी शाळेच्या तालुका पंचायतीच्या अनुदानातुन मंजुर झालेल्याूय नुतन खोलीचे भुमीपूजन प्रजास्ताक दिनाचे औचित्य साधुन तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या शुभहस्ते कुदळ मारून करण्यात आले.
प्रांरभी मुख्याध्यापक प्रकाश सुतार यानी प्रास्ताविक केले.तर सहशिक्षक प्रकाश कुंभार यानी उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी आमदार विठ्ठलराव हलगेकर यानी भुमी पुजन करून व कुदळ मारून नुतन खोल्याच्या कामाचा शुभारंभ केला.
तसेच कार्यक्रमाचे औचित्य साधुन स्मार्ट बोर्डाचे उदघाटन ही आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी जेष्ठ नागरीक कलराम पाटील, माजी ग्राम पंचायत सदस्य कृष्णा कुंभार , सदस्य परशराम कुंभार ,माजी तालुका पंचायत सदस्या सौ .कविता क़ष्णा कुंभार, एस डी एम सी अध्यक्ष विश्वनाथ अर्जून पाटील ,उपाध्यक्षा सौ .चैत्रा कुंभार, पी के पी एस सोसायटीचे संचालक नामदेव पाखरे,सुभाष कुंभार,एन डी पाटील, रामानंद पाटील,मंजुनाथ पाटील,ज्ञानेश्वर कुंभार,महेश कुंभार, मोहन सुतार, बी एम पाखरे ,सुनिल पाटील,केंप्पाणा मारीहाळ ,सिध्देश्वर मारीहाळ व शिकक्ष वर्ग तसेच विद्यार्थी वर्ग ग्रामस्थ उपस्थित होते.
आभार कन्नड शिक्षिका सौ एल.डी.नलवडी यानी मानले.