
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
कर्नाटक राज्य सरकारी नोकर क्रीडा स्पर्धा व सांस्कृतीक स्पर्धा शिमोगा येथे पार पडल्या.
या स्पर्धेत खानापूर सरकारी नोकर संघटनेचे तालुका अध्यक्ष बी एम येळ्ळूर यानी क्रीडा यस्पर्धेत भाग घेऊन ग्रिको रोमन कुस्ती प्रकारात सुवर्ण पदक मिळविले तर कबनाळी मराठी शाळेचे मुख्याध्यापक बापू दळवी यानी वेट लेफ्टिंग स्पर्धेत रौप्य पदक तर बाॅडी बिल्डिंग स्पर्धेत कास्य पदक असे दुहेरी पदकाला गवसणी घातली वेट लेफ्टिंग साठी त्याची राष्ट्रीय स्पर्धेत निवड झाली.
सहशिक्षक महावीर यमोजी यानी ही वेटलेफ्टिंग स्पर्धेत ५४ किलो गटात रौप्य पदक मिळविले. त्याबद्दल त्यांची राष्ट्रीय पातळीवर निवड झाली
त्याचबरोबर रामा हुलिक्कोटी यानीही कुस्ती स्पर्धेत कास्यपदक मिळवून खानापूर तालुक्याचे नाव उज्वल केले.
कर्नाटक राज्य स्तरीय क्रीडास्पर्धेत बेळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करत खानापूर तालुक्याचे नाव उज्वल केले.
त्यामुळे खानापूर तालुक्यातून बी.एम.येळ्ळूर,बापू दळवी ,महावीर यमोजी,रामा हुलिक्कोटी आदीचे सर्वथरातुन अभिनंदन होत आहे.