
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील)
बेळगाव येथील सागर डी. एड. कॉलेजच्या २००५ ते २००७ पर्यंत एकत्र शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा व गुरुवंदना कार्यक्रम रविवार दि.१८ रोजी एका खासगी हॉटेलात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या सुरवातील कै. सुनील सुतार व कै. सिंकदर कांबळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाच्या
अध्यक्षा माजी विद्यार्थीनी रेश्मा (मानसी) पाटील होत्या. प्रार्थना व स्वागतगीत प्रियंका मासेकर व सहकारी यांनी सादर केले. त्यांनंतर व्यासपिठावर उपस्थितांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालण्यात आले. या कार्यक्रमाचे औचित साधून प्रा. राजू हळब, प्रा. तानाजी नौकुडकर, अॅड. श्रीधर कुलकर्णी, प्रा. कल्पना धामणेकर, क्लर्क संजीव बागवे यांना स्मृतिचिन्ह व शाल देऊन सन्मानित करण्यात आले. उपस्थित प्राध्यापकांनी मोलाचे मार्गदर्शन केले. प्रास्ताविक भाषण परशराम पालकर यांनी केले. कार्यक्रमात सर्व माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करुन जुन्या आठवणींना उजाळा दिला. नम्रता पाटील, निता कित्तुरकर (चव्हाण) यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले.
यावेळी सदानंद कुंभार, विठ्ठल किणेकर, अनंत गोरे, प्रियंका मासेकर, अश्विनी पाटील, रेखा शहापूरकर, अर्जुन कांबळे यासह माजी विद्यार्थी उपस्थित होते.