
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
अवरोळी (ता.खानापूर) येथील अवरोळी -बिळकी लक्ष्मी यात्रेनिमित्त भेटीदाखल खानापूर तालुका ब्लॉक अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी व काॅग्रेस नेते विनायक मुतगेकर आदीनी मंगळवारी दि.२० रोजी अवरोळी गावचे काँग्रेस नेते शंकर हांदुर व सुभाष पेजोळी यांच्या घरी भेट देऊण यात्रेच्या शुभेच्छा देऊ केल्या.
यावेळी पाच वर्षानंतर साजरी होणार्या लक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन गावकर्याना शुभेच्छा देऊ केल्या.
यावेळी गावकर्यानी तालुका ब्लाॅक काॅग्रेस अध्यक्ष अँड ईश्वर घाडी व काॅग्रेस नेते विनायक मुतगेकर यांचे स्वागत केले.
यावेळ यात्रेसाठी भाविकानी गर्दी केली होती .
सायंकाळी पावसाने हजेरी लावल्याने भाविकांची तारांबळ उडाली.मात्र पावसात भाविकांचा उत्साह ओसंडुन वाहत होता.