
#श्रीमान माजी आमदार डीसीसी बॅक संचालक अरविंद पाटील यांचे आवाहन!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
नंदगड ( ता. खानापूर ) गावची ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीची यात्रा तब्बल २४ वर्षानी होत आहे.
बुधवारी दि.१२ फेब्रूवारी पासुन रविवार दि.२६ फेब्रूवारी पर्यत १२ दिवस श्रीमहालक्ष्मी यात्रा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी होत आहे.
श्रीमहालक्ष्मी देवीचा विवाह सोहळा माघ पौर्णिमा शके १९४६ बुधवारी दि. १२ फेब्रुवारी रोजी सुर्योदयाला ठिक ७ वाजुन ११ मिनीटानी अक्षतारोपण होणार आहे.तरी आपण सहकुटूंब,सहपरिवार ,मित्रमंडळीनी उपस्थिती राहून श्री महालक्ष्मी देवीच्या दर्शनाचा व उत्सवाचा लाभ घ्यावा.असे आवाहन माजी आमदार व डीसीसी बॅक संचालक श्रीमान अरविंद चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
यावेळी येताना कोणीही आहेर आणू नये .अशी कळकळीची विनंती माजी आमदार व डीसीसी बॅक संचालक श्रीमान अरविंद चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.