
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
अनगडी ( खानापूर ) येथील निवृत शिक्षक नारायण लक्ष्मण पेडणेकर ( वय ७५) याचे शनिवारी दि २६ रोजी निधन झाले.
त्याच्या पश्चात पत्नी दोन सुपुत्र सुना आणि चार कन्या नातवंडे असा परिवार आहे.
ते हलशी प्राथमिक शाळेतून निवृत्त झाले. इंग्रजी विषयातील तज्ञ शिक्षक म्हणून त्याची ओळख होती.
.आज रविवार दि.२७ सकाळी ११ वाजता अनगडीमध्ये अंत्यविधी होणार आहे.