
#उमा पारिपत्यदार याना ४०१ पैकी २८७ मते घेऊन विजय!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर ( सुहास पाटील )
हलशी ( ता.खानापूर ) येथील ग्राम पंचायतीच्या प्रभाग क्रमांक १ मधील मंगळवारी दि.२६ रोजी पार पडलेल्या पोटनिवडणुकीत हंजी पॅनलच्या उमेदवर उमा उदय पारिपत्यदार याना ४०१ मता पैकी २८७ मते मिळाल्याने मोठ्या मताधिक्याने हंजी पॅनेलचा दणदणीत विजय झाला आहे.
हंजी पॅनलच्या उमेदवार उमा उदय पारिपत्यदार विरोधात असलेल्या वर्षा विद्याधर जाधव याना ५८ मते मिळाली. वैशाली मल्लीकार्जून रजक्कणावर याना केवळ ४७ मते मिळाली तर ९ मते बाद ठरली.
या विजयात हंजी पॅनल हरविण्याचा प्रयत्न झाला असला तरी हंजी पॅनेलची प्रतिष्ठा असल्याने २८७ मतानी विजय मिळविला.
हंजी पॅनलचा उमेदवार उमा पारिपत्यदार याचा विजय घोषित होताच काॅग्रेस नेते संतोष हंजीच्या समर्थकानी गुलालाची उधळण व फटाक्याची अताषबाजी करून विजयोत्सव साजरा केला.
लागलीच खानापूर येथील शिवस्मारकांत राजा छत्रपती शिवाजी महाराज्याच्या पुतळ्याला हार घालुन अभिवादन करण्यात आले. व हलशी गाावत विजयोत्सव साजरा केला.