
# दुचाकी व ट्रॅक्ट्ररचा झाला आपघात!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
तोपिनकट्टी ( ता.खानापूर ) गावचा युवक नागराज पुंडलिक तिरवीर ( वय २१) याचा रविवारी दि.२४ रोजी सायंकाळी तोपिनकट्टी लोकोळी क्राॅसवर झालेल्या दुचाकी व ट्रक्टरच्या आपघातात मृत्यू झाला.
याबाबत पोलिसाकडुन मिळालेली माहिती अशी की, तोपिनकट्टी (ता.खानापूर ) येथील युवक रविवारी सायंकाळी तोपिनकट्टी लोकोळी क्राॅसवरून तोपिनकट्टीला जात होता.त्याचवेळी ट्रॅक्टरच्या टाॅलीला साईड मारण्याच्या प्रयत्नात असताना ट्रक्टर चालकाच्या निष्काळजीपणाने दुचाकी स्वार ट्रॅक्टर टाॅलीला धडकला.त्यामुळे तो दुचाकीसह रस्त्यावर जोराने पडला.त्यात जोराचा मार बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच खानापूर पोलिसानी घटनास्थळी धाव घेऊन तपास केला.यावेळी खानापूर पोलिसस्थानकाचे पी आय मंजुनाथ नाईक व पीएसआय गिरीष एम यानी पंचनामा करून पुढील तपास करीत आहेत.
खानापूर सरकारी दवाखान्यात सोमवारी मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृत देह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
सदर घटनेमुळे तोपिनकट्टी गावात दु:खवट पसरला आहे.