
खानापूर नगरपंचायतीने केली भाजीमार्केट गाळ्यांची भाडेवसुली.
#६० हजार रू. एकाच दिवशी जमा झाले!
# २४ गाळ्याची थकीत भाडे वसुली!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूर शहरातील रेल्वेस्टेशन रोडवरील भाजी मार्केट मधील भाजी गाळ्यांची महिण्याच्या महिन्याला भाडी वसुली होत नाही. त्यामुळे गाळे धारकांची भाडी दिवसेदिवस वाढत जाते.परंतु खानापूर नगरपंचायतीला वेळेत भाजीगाळ्यांची भाडी मिळत नाही.त्यामुळे नगरपंचायतीला विकासासाठी निधी उपलब्ध होत नाही.
यासाठी मंगळवारी दि १९ रोजी खानापूर नगरपंचायतीचे चीफ आँफिसर संतोष कुरबेट सह अधिकारी गंगाधर कांबळे , प्रेमानंद नाईक ,कर्मचारी भाजी मार्केटमध्ये जाऊण भाजी गाळेधारकाकडुन भाड्याची तसदी लावुन गाळ्यांची भाडी वसुल केली.
यावेळी जवळ पास २४ भाजी गाळेधारकाकडुन ६० हजार रूपये भाडे जमा केले. काहीची भाजी गाळेधारकांची अनेक वर्षाची भाडी वसुल करायची आहेत.
तेव्हा नगरपंचायतीने शिल्लक असलेली भाजी गाळेधारकांची भाडी वसुल केली तर नगरपंचायतीला चांगली भाड्याची रक्कम मिळू शकते.
यासाठी खानापूर नगरपंचायतीने भाजी गाळेधारकाकडुन भाडी वसुल करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
एकाच दिवशी ६० हजार रूपयाचे भाडे जमा केल्याने नगरपंचायतीच्या कर्मचाराचे कौतुक होत आहे.