
# महाविकास आघाडीला मतदान करा.!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्याच्या माजी आमदार व राष्ट्रीय प्रदेश क्राॅग्रेस पक्षाच्या सचीव कोल्हापूर भागाच्या निवडणुकीच्या प्रभारी डाॅ.अंजली निंबाळकर यानी कोल्हापूरच्या गांधी मैदानात महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराप्रसंगी बोलताना म्हणल्या की कर्नाटकात पंचहमी योजना राबविताना भाजपने राजकरण करत टीका केली.मात्र काॅग्रेसन न घाबरता ही योजना यशस्वी राबविण्याचे काम केले.भाजपने सातत्याने योजना मोडीत काढण्याचा प्रयत्न केला.मात्र काॅग्रेस सरकारने दिलेले वचन कधी मागे घेतले नाही.
असे सांगुन महाष्ट्राच्या सक्षम बांधणीसाठी महाविकास आघाडीला साथ द्या.व प्रचंड मताने निवड आणा.असे सांगुन भाजपला सडेतोड उत्तर दिले.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की,महाराष्ट्रातील जनता महायुती सरकारला कंटाळलेली आहेत. त्यामुळेच जाती-धर्माच्या नावावर राजकरण होत असल्याची टीका त्यानी यावेळी केली.
कोल्हापूरात सतेज पाटील याच्या निवडणुक प्रचारात त्या बोलत होत्या.प्रचाराच्यावेळी प्रियांका गांधी समवेत होत्या.
महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आल्याबरोबर महिलाना ३हजार रूपये,गरीबासाठी योजना गॅरंटी कार्ड देण्याचे आश्वासन दिले .
तेव्हा येत्या २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडुण आणण्याची मागणी केली.यापुढे महाविकास आघाडीचेच सरकार राहिले असा दावा केला.