
# तालुक्यात ऊस तोड सुरू!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
कर्नाटक सरकारने गळीत हंगामास परवानगी दिल्याने बेळगाव जिल्ह्यातील साखर कारखान्याच्या गळीत हगामास सुरूवात झाली आहे.
त्यामुळे ऊस तोड मजुरांच्या टोळ्यानी लवकरच खानापूर तालुक्यात हजेरी लावली.
बेकवाड भागात हुदली साखर कारखान्याच्या टोळ्या दाखल!
खानापूर तालुक्याच्या बेकवाड भागात हुदली साखर कारखाण्याची टोळी दाखल होऊन ऊस तोड सुरू झाली आहे.
यंदा आँक्टोबर पर्यत पावसाने हजेरी लावल्याने विलंब होत गेला.त्यातच महाराष्ट्र राज्याच्या विधान सभेची निवडणुक होत आहे.त्यामुळे सीमाभागातील ऊसावर साखर कारखानदाराचे डोळे लागुन आहेत.
यंदा पावसाच्या पुरामुळे ऊसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे इतर कारखान्याचा ऊस पळवा पळवीची शक्यता नाकरता येणार नाही. कारण बर्याच साखर कारखान्यानी आपली धुराडी पेटवुन जय्यत तयारी केली आहे.