
# घटनेबद्दल तर्कवितर्क !
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्याच्या हलशी बेकवाड रस्त्यावरील नेरसेवाडी पुलाच्या नाल्यावर सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास झालेल्या गोळी बारात एकजन जागीच ठार झाल्याची घटना घडली.
या घटनेने खानापूर तालुका हादरून गेला आहे.
याबाबतची माहिती अशी की हलशी बेकवाड रस्त्यावरील नेरसेवाडी नाल्याच्या पुलावार सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास गोळी बार झाला.त्यात अल्ताफगौस मकानदार ( वय २८ ) हा युवक जागीच ठार झाला. पहाटे तीनच्या सुमारास हा गोळी बार कशासाठी व का केला असावा हे अद्याप समजले नाही.
घटनेची माहिती पोलिसाना समजताच पोलिसानी घटनास्थळी धाव घेऊण पोलिसफाट्यासह हा परिसर बंदोबस्त केला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशीकी , अल्ताफ हा हलशी बेकवाड रस्त्यावरील नेरसेवाडी पुलाजवळ वाळू काढण्यासाठी जात असे. हमाली करणे ,वाळू काढणे हा त्याच्या रोजगार होता.
मात्र सोमवारी रात्री तीनच्या सुमारास गोळी बार झाला.व काहीनी त्याचा मृत्यूदेह घरी आणला.त्यामुळे यामागेचा संशय बळवला आहे.
ही बातमी तालुक्यात वार्यासारखी पसरली
पोलिसाना हीं पाचारण करण्यात आले. लागलीचे अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख,पोलिस उपाधीक्ष ,पोलिस निरीक्षक फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसाना चौकशीसाठी दोघाना ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
सदर घटनेमुळे तालुक्यात एकच गडबड उडाली आहे.