
#नागरीकानी घेतला फराळाचा लाभ!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
कबनाळी ( ता. खानापूर ) येथे बेळगाव येथील इनर व्हिल क्लब व सामाजिक संस्था फेसबुक फ्रेंड सर्कल यांच्यावतीने दिवाळीच्या सनाचे औचित्य साधुन नागरीकाना फराळाचे वाटप करण्यात आले .
यावेळी बोलताना खानापूर तालुका ग्राम पंचायत सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर म्हणाले की,तालुक्याच्या पश्चिम भागातील अति मागासलेल्या निलावडे ग्राम पंचायत हद्दीतील कबनाळी गाव अति मागासलेले आहे. अशा गावाला बेळगाव येथील इनर व्हील क्लब,सामाजिक संस्था,फेसबुक फ्रेंड सर्कल यांच्याकडे दिवाळीच्या सनाचे आमंत्रण केले होते.
याविनंतीला मान देऊन दानशुर व्यक्तीनी कबनाली गावाला भेट देऊण गावकर्याच्या सोबत फराळाचे वाटप करून दिवाळीच्या शुभेच्छा देऊ केल्या.
यावेळी कबनाळी गावातील गणेश मंदिराच्या आवारात अबालपासुन वृध्दापर्यत सर्वाच्या सोबत या मान्यवरानी गप्पागोष्टी करून कबनाळी गावच्या समस्या,सुख दुख जाणुन घेतले. व क्लब मार्फत बेळगाव जिल्हाधिकार्याना माहिती देऊ असे सांगीतले.
यावेळी कबनाळी मराठी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्याच्या बुध्दीमतीचे कौतुक केले.यावेळी मुख्याध्यापक बापू दळवी,इतर शिक्षकाचे कौतुक केले.
यावेळी कार्यक्रमाला गावचे नागरीक राणी मामा,ग्राम पंचायत माजी अध्यक्ष राजाराम धुरी,अंकुश होळकर,लक्ष्मण धुरी,आनंद गावकर,सहदेव गावकर,चंद्रकांत होळकर,तानाजी गावडे,पांडुरंग देसाई,मनोहर ओळकर,तुकाराम दळवी,सहदेव दळवी,बळीराम दळवी,तसेच गावातील महिला मंडळ ,तरूण युवक मंडळ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुख्याध्यापक बापू दळवी यानी केले.
तर आभार राजाराम धुरी यानी मानले.
कबनाळी येथे दीपावली निमित्त फराळाचे वाटप अति मागासलेल्या पश्चिम भागातील या गावी निलावडे क्षेत्रामधील खानापूर तालुक्यातील हे गाव किती मागासलेले आहे याचे उत्तम उदाहरण म्हणजे कबनाळी या गावची माहिती ग्राम ग्रामपंचायत सदस्य व तालुका ग्रामपंचायत मेंबर से युनियनचे अध्यक्ष विनायक मुदखेड यांनी बेळगाव येथील सामाजिक संस्था फेसबुक फ्रेंड सर्कल व िल क्लब बेळगाव यांच्या सर्व कमिटीला कळविले त्यांच्या विनंतीला मान देऊन सदर क्लबचे सर्व पदाधिकारी व दानशूर व्यक्ती यांनी करण्या दिवाळी दिवशी येऊन गावातील सर्व लोकांना फराळाचे वाटप करून त्यांच्या समवेत दीपावलीचा सण साजरा केला व दीपावली निमित्त लोकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या व गावातील वयोवृद्ध महिला व वयोवृद्ध नागरिक यांच्याशी निसर्गरम्य परिसरात कबनाळी येथील श्री गणेश मंदिर समोर गप्पागोष्टी करून गावच्या समस्या जाणून घेतल्या त्या समस्यांची जाणीव आपण आपल्या क्लब मार्फत बेळगाव येथील डीसी ना कळवू असे सांगितले सादरी कार्यक्रमाला येथील शाळेचे शिक्षक दळवी सर व त्यांचे सर्व स्टाफ उपस्थित होते मुलांचा अभ्यास करून सदरचे सर्व मेंबर यांनी त्यांच्या अभ्यासाबद्दल मुलांचे व त्या शिक्षकांचे अभिनंदन केले या कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक राणी मामा तसेच गावातील ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष राजाराम धुरी अंकुश होळकर लक्ष्मण राणे लक्ष्मण धुरी आनंद गावकर सहदेव गावकर चंद्रकांत होळकर तानाजी गावडे पांडुरंग देसाई मनो हर मनोहर ओळकर तुकाराम दळवी सहदेव दळवी बळीराम दळवी माझी ग्रामपंचायत सदस्य व गावातील महिला मंडळ तरुण युवक मंडळ शाळेचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाला विनायक मुदगेकर व राजारामपुरी यांनी आपले विचार मांडले सूत्रसंचालन शाळेचे हेडमास्तर बापू दळवी यांनी केले व आभार प्रदर्शन राजाराम धनी आणि मांडले गावातील निसर्गरम्य परिसर पाहून व स्वच्छता पाहून आलेल्या क्लबच्या लोकांनी समाधान व्यक्त केले