
#तालुक्यात लागोपाठ ६ जनाच्या आत्महत्या!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
लक्केबैल (ता.खानापूर ) येथील पी के पी एस सोसायटीचे सेक्रेटरी प्रकाश पांडुरंग पाटील( वय.४६ ) लोकोळी गावचे सुपूत्र यानी विष घेऊन आत्महत्या केल्याची घडली.
लोकोळी गावचे प्रकाश पाटील हे गेली २२ वर्षे लक्केबैल पी के पी एस सोसायटीचे सेक्रेटरी म्हणून सेवा बजावत होते.
मंगळवारी दि २९ रोजी दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत कर्मचारी जेवणाला गेल्याचे पाहुन संस्थेच्या कार्यालयात किटक नाशक प्राशन केले.
किटक नाशक प्राशन केल्याची बाब कर्मचार्याच्या लक्षात येताच त्याना लागलीच खानापूर सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले .
मात्र विष अंगात भिडल्याने लागलीच बेळगाव के एल ई हास्पिटल मध्ये रात्री दाखल करण्यात आले.
मात्र उपचाराचा उपयोग न झाल्याने बुधवारी त्याचे निधन झाले.
गुरूवारी त्यांच्यावर लोकोळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.