
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
१ नोव्हेंबर १९५६ रोजी मुंबई प्रांतातील मराठी बहुल भाग अन्यायाने म्हैसुर प्रांतात डाबण्यात आला.तेव्हा पासुन १ नोव्हेंबर हा दिवस सीमाभागात काळा दिन म्हणून पाळला जातो.त्यानिमित्ताने खानापूर तालुका म ए समितीच्यावतीने केंद्र सरकारचा निषेद नोंदविण्यासाठी लाक्षणिक उपोषणास बहुसख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले .
यावेळी नंदगड येथील जनजागृतीत सीमासत्याग्रही पुंडलिक चव्हाण,समिती अध्यक्ष गोपाळ देसाई ,सरचिटणीस आबासाहेब दळवी,मुरलीधर पाटील,राजाराम देसाई,मोहन गुरव,रूक्माणा जुंझवाडकर,विठ्ठल गुरव,विनायक चव्हाण ,नागेश पाटील,ब्रह्मानंद पाटील,प्रविण पाटील,प्रकाश गिरी आदी समितीचे शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.