
#माजी सभापती सयाजी पाटील यांच्या भात,ऊस पिकांचे नुकसान!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूर तालुक्यात हत्तीकडुन पिकांचे नुकसान वर्षभर सुरूच आहे.गेल्या सहा महिण्यापूर्वी कबनाळी ,आंबोळी,भागात वायंगान भाताचे ,केळी,फळ झांडाचे नुकसान करून हत्तीची भ्रमण तालुक्यात सुरूच आहे.
आता सुगीच्या दिवसात पुन्हा कुणकीकोप, सागरे, वडेबैल मार्गे चापगावात गेल्या दोन दिवसा पूर्वी स्थिरवलेल्या हत्तीने काल कारलगा गावच्या शेतवाडीत सर्वे नंबर १०४ मध्ये माजी सभापती सयाजी पाटील (शिवोली ) यांच्या शेतात येऊन नुकताच कापलेल्या भात पिकाचे नुकसान केले आहे. तर काही भागातील उस पिकाचे नुकसान केले.
तर बुधवारी सकाळी जळगे येथील विठ्ठल ठाकूर यांच्या शेतातील उस पिकात होता. हत्तीला बघण्यासाठी एकच गर्दी होत होती.
त्यामुळे हत्ती बितरण्याची भिती व्यक्त होत आहे.
या हत्तीचा बंदोबस्त करण्यात वनखाते आपयशी ठरत आहे.त्यामुळे शेतकर्याचे पिकांचे नुकसान होत आहे.