
#मृत रामगुरवाडीचा!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरजवळील खानापूर जांबोटी महामार्गावरील शिवाजीनगर येथील रेल्वे पुलावर समोरासमोर दोन दुचाकीचा आपघात होऊण एकाच जागीच मृत्यू झाला . तर दोघेजन गंभीर झाल्याची घटना शुक्रवारी दि २५ रोजी सायंकाळी घडली.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, नागुर्डा ( ता.खानापूर) येथील अमोल खोबान्ना पाखरे ( वय २६) हा दुचाकीवरून खानापूरहुन नागुर्ड्याकडे जात होता.तर रामगुरवाडी ( ता.खानापूर ) गावचा युवक शंकर धाकलू गुरव( वय ३६) हा आपल्या दुचाकीवरून आपले काका रवळू गुरव (वय ६६)याच्यासह रामगुरवाडीहुन खानापूरकडे येत असताना शिवाजी नगरजवळील रेल्वेपुलावर दोन्ही दुचाकीची समोरासमोर जोराची धडक बसली यात रामगुरवाडीचा युवक शंकर धाकलू गुरव हा जागीच ठार झाला. तर रवळू गुरव अमोल पाखरे हे दोघे गंभीर जखमी झाले. लागलीच त्याना खानापूर सरकारी दवाखान्यात उपचारासाठी पाठविण्यात आले .त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याना पुढील उपचारासाठी बेळगावला पाठविण्यात आले .
पोलिसानी पंचनामा करून पुढील तपास करत आहेत.