
#बाचोळी वार्डसभेत पीडीओ, सदस्याना धारेवर!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
रामगुरवाडी ग्राम पंचायतहद्दीतील मयेकरनगरात गेल्या २० वर्षापासुन रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याने गुरूवारी दि.२४ रोज बाचोळीत कलमेश्वर मंदिरातील वार्ड सभेत पी डी ओ व सदस्याना मयेकरनगरातील नागरीकानी चांगलेच धारेवर धरले.
यावेळी बोलताना ए बी मुरगोड म्हणाले मयेकर नगर हे खानापूर शहरालागत असुन गटारीबरोबर रस्त्याच्या विकासाकडे गेली २० वर्षे दुर्लक्ष केले आहे.त्यामुळे सध्या यारस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे.शाळकरी मुले कित्येकवेळा खड्ड्यामुळे पडुन जखमी होत आहे.याकडे पीडीओ चे दुर्लक्ष होत आहे. येत्या दोन दिवसात रस्त्याचे खड्डे बुजविले नाही तर आम्ही स्वखर्चाने रस्त्यावरील खड्डे बुजविणर असे स्पष्ट सांगीतले.
बाचोळी वार्ड सभेला सीडीपी अधिकार्याची दांडी!
गुरूवारी दुपारी बाचोळी वार्ड सभेचे आयोजन करण्यात आले होते.मात्र तालुक्यातील अधिकार्यावर लोकप्रतिनिधिचा वचक नसल्याने नोडलअधिकारी म्हणून नेमणुक केलेल्या सीडीपीओ नी दांडी मारून वेळ मारून नेला.त्यामुळेच तालुक्यात अधिकारी बीनदास्त वागतात.
बाचोळी वार्ड सभेत रस्ते ,गटारी, शाळा इमारतीच्या दुरूस्ती तसेच सन २०२५- २६सालाकरीता उद्योगखात्री योजनाचे बजेट,एनआरजीची कामे करण्याबाबत चर्चा करण्यात आली.यावेळी कृषी होंडा,जमिनसपाटीकरण,जनावरांचा गोठा,कुपनलिका संदर्भात योजनाची माहिती देण्यात आली.
वार्ड सभा असल्याची माहिती नागरीकांना दिली नाही!
बाचोळीत गुरूवारी वार्ड सभेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पीडीओ ,सदस्यानी नागरीकाना दिलीच नाही.अशी तक्रार नागरीकांनी केली.त्यामुळे ग्राम पंचायतीच्या कामाकाजाबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.
यावेळी ए बी मुरगोड, शिवा मयेकर, पी सी पाटील ,मारूती देसाई, एल डी पाटील,अनिता बाळन्नावर,सुध्दा गावडे,सातेरी मादार,मंजुनाथ कांबळे,गंगाराम पाटील लक्ष्मण गुरव, महादेवी मादार,निर्मला पाटील, वार्डाचे सदस्य उपस्थित होते .