
# हायस्कूल विभागातुन अर्ज भरला!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
कर्नाटक राज्य सरकारी नोकर संघाच्या २०२४ ते २९ सालाच्या निवडणुकीनिमित्ताने खानापूर तालुका सरकारी नोकर संघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून गोपीनाथ बडीगेर यानी आपला अर्ज शुक्रवारी दि.१८ रोजी खानापूर तहसील कार्यालयात निवडणुक अधिकारी श्री.यकुंडी,निवृत्त मुख्याध्यापक
ए.आर.बाळगप्पणावर,शिवानंदन हुक्केरी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी बोलताना उमेदवार बोलताना म्हणाले की, कर्नाटक राज्य सरकारी नोकर संघाच्या खानापूर तालुका सरकारी नोकर संघासाठी हायस्कूल विभागातुन मी अपक्ष उमेदवार म्हणुन निवडणुक लढवित आहे.
खानापूर तालुक्यातील सर्व हायस्कूल विभाग शिक्षक ,शिक्षिकेतर सदस्यानी मला बहुमोल मत देऊण विजयी करा असे मत प्रगट केले.
यावेळी शिक्षक एम आर चवलगी, ए.आर. भोसले ,किरण पाटील,जी एस . बडिगेर, आय .जे.बेपारी,सुनिल अनीगोळ,श्रीमती लक्ष्मी पाटील,बी .बी. मेदार, बी.के.तळवार तसेच तालुक्यातील विविध खात्याचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.