
#बेळगांव जिल्हा मर्यादीत १७ वर्षाखालील मुला मुलीकरीता!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर (सुहास पाटील)
सालाबादप्रमाणे यावर्षीही यडोगा ( ता. खानापूर ) येथे बेळगाव जिल्हा मर्यादित, शनिवार दि. २नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक ९ वाजता १७ वर्षा खालील (Under 17) मुला व मुलींसाठी भव्य खो खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धाच्या उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. नागेश मा. सनदी ( प्राध्यापक ताराराणी पि. यु. कॉलेज खानापूर) उपस्थित राहतील
मैदानाचे उदघाटन रमेश भ. हंगिरकर, यांच्याहस्ते तर मैदान पूजन शंकर वी. चौगुले
इतर मान्यवराच्याहस्ते होणार आहे. रामचंद्र खांबले, सौ. मिरजी ( क्रीडाधिकारी खानापूर ), चापगांव माजी ग्राम पंचायत अध्यक्ष रमेश धबाले, नागरज यळूरकर, मारुती पुं. चोपडे, पत्रकार पिराजी कुराडे, प्रकाश पाटील, डॉ. विनायक नांद्याळकर, प्रताप ठक्केकर, गंगाराम निलजकर, जोतिबा भेकणे, विठ्ठल सनदी, मारुती गुरव, संदीप नीलजकर, अनिल देसाई, व्हि. बी. होसूर, इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
विजयी संघासाठी मुलाकरीता पहिले बक्षिसे १०,००१ रू. कै. भरमानी रा. हंगिरकर यांच्या स्मरनार्थ, श्री देवेंद्र हंगिरकर, श्री रमेश हंगिरकर, श्री अमोल हंगिरकर यांच्या कडून,
दुसरे बक्षिस ५००१ रू.शेखर परशराम हंगिरकर यांच्या कडून
तिसरे बक्षीस २००१ रू.सलीम आय. कित्तूर यांच्या कडून
मुलांसाठी सर्व चषक महादेव क. कुपटेकर यांच्याकडून.
विजयी संघासाठी मुलींकरीता पहिले बक्षिसे
१०,००१ रूपये.साठी मधू ना. हंगिरकर ५००० रू.तर संदीप ना. अंधारे ,कडुन २५००रू. कु. मयुरी व माधुरी मल्लापा अंधारे यांच्या कडून २५०० रू.
दुसरे बक्षिस ५००१ रूपये साठी जोतिबा रा. अंधारे कडुन २५०० रू. व कु. परशराम मो. लाड कडुन२५००रू.
तिसरे बक्षीस : २१०१ नामदेव भ. चौगुले यांच्या कडून
मुलींसाठी सर्व चषक श्री. नारायण गणपती पाटील यांच्या कडून देण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी नाव नोंदविण्याची अंतिम तारीख शुक्रवार दि.१ नोव्हेबर असेल.
संपर्कासाठी मोबईल नंबर 7090913621, 8497854048, 9741213489
या स्पर्धा सरकारी प्राथमिक मराठी शाळेच्या पटांगणावर होणार आहेत.