
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर (सुहास पाटील )
चिक्कमन्नोळी (ता .खानापूर )येथे श्रावणमास निमित्त श्री अरूढमठ यांच्या सौजन्याने मंगळवारी दि ३ ते ५ सप्टेंबर पर्यत जगदगुरू श्री सिध्दारूढ जलरथोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची सुरूवात होत आहे.
श्री शिवपूत्र महास्वामी याच्या सानिध्यात मंगळवारी दि.३ रोजी सायंकाळी ७ वाजता कार्यक्रमाचे उदघाटन होणार आहे.
प.पू.अभिनव सिध्दलिंग महास्वामी यांच्या दिव्यसान्निध्यात होणार्या कार्यक्रमात श्री प.पू.सदगुरू श्री.गुरूपूत्र महाराज यांच्या उपस्थितीत प.पू.श्री अभिनव शरीप,प.पू श्री.सिध्दया स्वामी ,प.पू.श्री जगदिश शरण आदी उपस्थित राहणार आहेत.
तरी खानापूर तालुक्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.