
खासदार कागेरींचा सत्कार!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर (सुहास पाटील)
तब्बल तीन महिण्याच्य कालावधीनंतर कारवार लोकसभा मतदार संघाचे खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी यानी सोमवारी दि २ रोजी खानापूरच्या दौर्यावर आले असता. कर्नाटक माध्यमिक शाळा व काॅलेज नोकर संघाच्यावतीने संघटनेचे प्रधान कार्यदर्शी सल्लिम कित्तूर यांच्या नेतृत्वाखाली खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांचे स्वगात करून निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले की सन १९९५ पासुन ज्या प्राथमिक, माध्यमिक अथवा काॅलेज आदी (विनाअनुदान) अनुदान रहित आहेत.मग कोणत्याही माध्यमच्या असो त्याना सरकारने अनुदान द्यावे.
गेली कित्येक वर्षे या (विनाअनुदान) अनुदान रहित शाळा काॅलेजमधील शिक्षक बीन पगारी काम करत आहेत. त्याच्यावर उपास मारीची वेळ आली आहे.अशा शिक्षकाना कुटूंब सांभाळत शिक्षकी सेवा करने तारेवरची कसरत होत आहे.
तेव्हा खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी हे आमदार, माजी शिक्षणमंत्री होते.सभापती म्हणून काम पाहिले आहे. त्याना याचा चांगला अभ्यास आहे.आता ते खासदार आहेत.
तेव्हा विनाअनुदानीत शाळातील शिक्षकांच्या समस्या त्यानी जवळुन पाहिल्या आहेत.त्यामुळे सरकारकडे सन १९९५ पासुनच्या सर्व माध्यमच्या शाळाना अनुदान मंजुर करण्यासाठी प्रयत्न करावा.सर्व शिक्षकाचे भविष्य उज्वल करावे.अशी मागणी केली आहे.
निवेदन देताना कर्नाटक राज्य माध्यमिक शाळा व काॅलेज नोकर संघटना प्रधान कार्यदर्शी सल्लिम कित्तूर, निवृत्त मुख्याध्यापक व्ही.बी.होसुर, सी एस कदम,एन एम देसाई, के .एम पाटील,
अरूण पाटील,शेखर पाटील,शांताराम यळुरकर,एस.एस.नंद्याळकर,आर.एल .पाटील,श्री केसरकरआदी उपस्थित होते.
#खासदार कागेरीनी निवेदनाचा केला स्विकार!
यावेळी खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरीनी निवेदनाचा स्विकार करून विना अनुदानीत शाळा,काॅलज शिक्षक कर्मचार्याच्या समस्या मला जवळून माहित आहेत.त्या सोडविण्यासाठी मी नक्की प्रयत्न करीन असे आश्वासन दिले.