
पाय घरल्याने पाण्यात बुडाले!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
गर्लगुंजी ( ता. खानापूर ) गावचे शेतकरी नागो गंगाराम बाबीचे (वय .५५ ) रा चव्हाट गल्ली. हे शनिवारी शेतात गेले होते.सायंकाळी पिण्यासाठी पाणी आणण्यासाठी विहिरीकडे गेले होते .हात पाय धुण्यासाठी विहीरीत उतरत असताना पाय घसरून पाण्यात पडल्याने त्यांचा मृत्यू झाला.
सायंकाळी उशीरा पर्यत घरी न आल्याने शेताकडे जाऊन शोधाशोध केली असता विहीरीच्या काठी चप्पल दिसुन आले .लागलीच विहिरीत शोध घेतला असता मृत्यूदेह आढळुन आला.
खानापूर पोलिस स्थानकात घटनेची नोंद झाली असुन सरकारी दवाखान्यात शवचिकित्सा करून मृत्यूदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
रात्री उशीरा गर्लगुंजी स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्याच्या मागे पत्नी ,दोन मलगे,दोन मुली असा परिवार आहे.