संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका हा अंतिजंगलाने व्यापलेला तालुका या तालुक्यात हेस्काॅम खात्याला वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असे,त्यात लाईनमनची संख्या फारच कमी त्यामुळे लाईमनची नितांत गरज होती.
ही समस्या घेऊन काही लाईनमन कर्मचारी रायगड येथे माजी आमदार डाॅ.अंजलीताई निंबाळकर यांची भेट घेतली. व खानापूर तालुक्याला ४५ लाईनमनची कमतरता आहे.अशी समस्या सांगीतली.
लाईनमनची कर्मचार्याची आडचण समजताच माजी आमदार डाँ.अंजलीताई निंबाळकर यानी हेस्काॅमच्या एम डी वैशाली मॅडम यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क साधुन खानापूर तालुक्यातील लाईनमनच्या कमतरते बद्दल चर्चा केली.
लागलीच पाॅवर मिनिस्टराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.मात्र संपर्क होऊ शक ला नाही.काही वेळातच पाॅवर मिनिस्टरनी स्वता माजी आमदार डॉ अंजलीताई निंबाळकर यांच्याशी संपर्क साधला.यावेळी माजीआम.डॉ.निंबाळकर
यानी बोलताना सांगीतले की हेस्काॅमच्या एम डी वैशाली मॅडमशी लाईनमच्या कमतरतेविषयी बोलले आहे. तेव्हाआपण ही एम डीना समस्या सांगा अशी विनंती पाॅवर मिनिस्टर यांच्याकडे केली.
लागलीच खानापूर तालुक्यासाठी ४५ लाईनमनची मंजूरी मिळाल्याची बातमी कर्मचारी संतोष राथोड यानी मा जी आमदार डॉ अंजलीताई निंबाळकर याना दिली.व खानापूर तालुक्याची मोठी समस्या दुर झाल्याचा आनंद व्यक्त केला.
यावेळी उदय मादार,हरित कडुगोल,गंगाधर चवलगी,भरतेश नागनुर,अनिल पुजेर,असीफ अत्तार,बस राज हवलदार आदी उपस्थित होते.
खानापूर तालुका हेस्काॅम खात्याची महत्वाची समस्या मार्गी लागल्याने कर्मचार्यासह तालुक्यातील नागरीकातुन समाधान पसरले आहे.
