
#रस्त्यावर पाणी येण्याची शक्यता!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील कुसमळी जवळी ब्रिटीश कालीन पुलाची दुरावस्था झाल्याने याठिकाणी नविन पुलाची उभारणीचे काम करण्यात येत आहे.
मलप्रभा नदीवरील तोराळी तसेच हब्बनहटटी बंधार्याच्या फळ्या काढल्याने गेल्या चार दिवसापासुन पावसाचे प्रमाण वाढल्याने मलप्रभानदीच्या पात्रात पाण्याचा वाढुन कुसमळी पुलाजवळील पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता त्यामुळे वाहतुकीला कुसमळीपुलाजवळील रस्ता वाहतुकीला ठप्प होणार आहे.
बेळगांव चोर्लामार्गे गोव्याला होणारी वाहतुक बंद होण्याच्या मार्गावर आहे. तेव्हा प्रवाशाना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
सध्या पावसाची रिमझिम सतत चालु आहे. त्यामुळे पावसाचे पाणी वाढुन कुसमळी पुला जवळील रस्ता पुर्ण पणे ठप्प होण्याच्या मार्गावर आहे.तेव्हा यामार्गावरून येजा करू नये . याची दक्षता घ्यावी.अशी सुचना करण्यात आली आहे.