
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील कडोलकर गल्लीतील बसवेश्वर मंदिराच्या सभा मंडपाचा उदघाटन सोहळा व भूमी पुजन कार्यक्रम आज शुक्रवार दि.२३ रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे.
यावेळी अवरोळी मठाचे परमपूज्य स्वामी चन्नबसू देवरू यांच्या सान्निध्यात होणार्या कार्यक्रमाला उदघाटक म्हणून खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी ,आमदार विठ्ठल हलगेकर,व माजी आमदार अरविंद पाटील आदीच्या उपस्थित होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बसवेश्वर देवस्थान सेवा संघाचे चेअरमन चंद्रकात कोडोळी हे उपस्थित राहणार आहेत.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून नगराध्यक्षा सौ मिनाक्षी प्रकाश बैलुरकर ,चीफ आँफिसर संतोष कुरबेट, बेळगाव जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी,भाजप युवा नेते पंडित ओगले, नगरसेविका मेघा कुंदरगी,नगरसेवक आप्पया कोडोळी, श्री बसवेश्वर मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष सर्व सदस्य व इतर उपस्थित राहणार आहेत. तरी सर्वानी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.