
#दुसर्या व तिसर्या क्रमांकाची कुस्ती बरोबरीत!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूर कुस्ती मैदानात रविवारी महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळने हरियाणाचा भारत केसरी सोनूकुमारला लेपेट डावावर अवघ्या दहाव्या मिनीटात अस्मान दाखवत खानापूर कुस्ती मैदान मारले.
प्रथम क्रमांकाची कुस्ती आमदार विठ्ठल हलगेकर व नाशीर बागवान यांच्याहस्ते लावण्यात आली.
दुसर्या व तिसर्या क्रमांकाची कुस्ती बरोबरीत सुटली. दुसर्या क्रमांकाची पै.शुभम सिदनाळ पै.पवनकुमार यांच्यातील कुस्ती एम डी सदानंद पाटील व भाजपचे माजी तालुका अध्यक्ष संजय कुबल,अर्बन बॅक चेअरमन अमृत शेलार,संचाल मारूती पाटील ,विजय गुरव,प्रकाश पाटील पंडित ओगले आदीच्याहस्ते लावण्यात आले.
तिसर्या क्रमांकाची ही बरोबरीत सुटली .
चौथ्या क्रमांकाची कुस्ती शिवय्या पुजारी विजयी ठरला.विजयी पैलवान कार्तिक निट्टूर,शिवराज इटगी,श्रीधर शिनोळी,प्रल्हाद मुचंडी,रोहित कोलिक,जोतिबा चापगाव,दुर्गेश संतीबस्तवाड, राहुल माचीगड,मंजुनाथ संतीबस्तवाड,देवा येळ्ळूर, सुजल फोंडेकर,संग्राम मोदेकोप,संजू दावणगीरी ,निखिल कंग्राळी शिवा दड्डी,प्रेम कंग्राळी,विनय शिनोळी,विनायक येळ्ळूर,विकास चापगांव,सिध्दू धारवाड,ओमकार राशिवडे,रोहन कोडोली हे विजयी ठरले.
मेंढा कुस्तीत पंकज चापगाव व महेश तिर्थकंडे हे विजयी ठरले!
महिला कुस्तीत शिवानी वड्डेबैल व ऋतुजा वडगाव विजयी ठरल्या!
खानापूर कुस्ती आखाड्याचे उदघाटन आमदार विठ्ठल हलगेकर,माजी आमदार अरविंद पाटील ,कुस्तीगीर संघटने चे अध्यक्ष हणमंत गुरव ,उपाध्यक्ष रूद्राप्पा हंडोरी,खजिनदार लक्ष्मण झांजरे आदीच्या उपस्थित झाले.
यावेळी आखाड्याचे पुजन भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, नेत्या धनश्री सरदेसाई ,उद्योजक भूषण काकतकर, शंकरगौडा पाटील, आदीच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी कुस्तीगीर संघटनेचे लक्ष्मण बामणे,प्रकाश मजगावी ,राजाराम गुरव,पाडुरंग पाटील, सदानद होसुरकर,मल्लापा मारीहाळ ,शंकर पाटील ,अर्जुन जांबोटी ,यशवंत आल्लोळकर,श्री दावणगेरी,अँड आय आर घाडी आदी उपस्थित होते.
पंच म्हणून आमदार विठ्ठल हलगेकर,बाळाराम पाटील ,लक्ष्मण बामणे दौलत कुगजी,पांडुरंग पाटील ,आतुल शिरोळे आदीनी काम पाहिले.