
#संगीता पाटील राणी चन्नम्मा युनिर्व्हसिटीली ४था रॅक!तर कु.मिटगार ८वा रँक!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील सरकारी प्रथम दर्जा महाविद्यालयाचासांस्कृतीक ,क्रिडा,एन.एस.एस. तसेच विद्यार्थ्याना निरोप असा सयुंक्त कार्यक्रम खानापूरातील जाबोंटी रोडवरील शनाया पाम्स कार्यालयात बुधवारी दि.१४ रोजी पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ.डी.एम.जवळकर होते.प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विठ्ठलराव हलगेकर ,तर प्रमुख वक्ते म्हणून निवृत्त प्राध्यापक विरूपाक्षी कुपटी होते.
तर व्यासपिठावर सीडीसी मेंबर नगरसेवक आपाय्या कोडोळी,निवृत्त मुख्याध्यापक ए.बी मुरगोड,जाॅर्डन गोन्साल्वीस,प्रकाश निलजकर,रवी बडगेर ,निवृत्त मुख्याध्यापक व्ही बी होसुर, राजेद्र रायका. विद्यार्थी प्रतिनिधी कल्लापा पाटील,विद्यार्थीनी प्रतिनिधी शिवानी दंडगल आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक प्रा.अब्रीश रेवतगांव यानी केले.
प्रारंभी प्राचार्य डाॅ.डी.एम.जवळकर यानी स्वागत केले.
यावेळी राणी चन्नामा युनिर्व्हसीटीला ४ रॅक मिळविलेल्या संगीता पाटील व ८ वा रॅंक मिळविलेल्या कुमारी मिटगार या विद्यार्थीनीचा तसेच यंदाची जनरल चँपियनशीप मिळविलेल्या सतीश चोर्ला व धनश्री सुतार आदीचा आमदार विठ्ठलराव हलगेकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल,पुष्पगुच्छ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार विठ्ठलराव हलगेकर म्हणाले की, विद्यार्थ्यानी पदवी संपादन केल्यानंतर पुढील शिक्षणाकडे दुर्लक्ष न करता शिक्षणात खंड पडू देऊ नये.
आज विद्यार्थ्याना नोकरीसाठी दहाही दिशा मोकळ्या आहेत.तेव्हा नोकरीसाठी प्रयत्न करा.असे सांगुन पदवी विद्यार्थ्याच्या निरोप समारंभाला विद्यार्थ्यासह पालकांची ही उपस्थिती तितकिच महत्वाची आहे. तेव्हा यापुढे पालकाना ही आमंत्रित करा.असा सल्ला दिला.
यावेळी प्रमुख वक्ते निवृत्त प्राध्यापक विरूपाक्षी कुपटी यानी विद्यार्थ्याना जीवनात यशस्वी होण्यासाठी सतत प्रयत्न करणे गरजे आहे. तेव्हा पदवी मिळाली म्हणून न थांबता शिक्षण घेत जावा असे विचार व्यक्त केले.
कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्रा.डाॅ .विद्या जिरगे,डाॅ.सी बी.ताबोजी,प्रा.अलका कुरणे,प्रा.एम के .बाळीकाई, प्रा.गीता शिवपूजी व विद्यार्थी प्रतिनिधीनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी प्राध्यापक वर्ग , विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
आभार प्रा.कांबळे यांनी मानले.