
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर (सुहास पाटील )
कणकुंबी (ता.खानापूर ) येथील श्री माऊली विद्यालयाचे मुख्याध्यापक व कालमणी गावचे सुपूत्र सुनिल गणपती चिगुळकर याना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे यांच्यावतीने देण्यात येणारा महात्मा फुले शिक्षक रत्न पुरस्कार जाहिर झाला आहे.
हा पुरस्कार अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनात शरद पवार यांच्याहस्ते शनिवारी दि १० मे रोजी प्रदान करण्यात येणार आहे.
साहित्य संमेलनाचे उदघाटन शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. पुरस्कारासाठी निवड झाल्याचे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष शरद गोरे आणि उपाध्यक्षा शुभांगीताई काळभोर यांनी जाहिर केले आहे.