
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
सगळीकडे आंब्याचे सीजन असल्याने झाडावर चढुन आंबे काढण्याचे प्रयत्न होत आहे.
अशाच प्रकार मेंढेगाळी ( ता.खानापूर ) गावचे व सध्या पुणे येथील उद्योजक रवळनाथ नारायण गुरव ( वय.४७) हे भांबूर्डा गावाजवळील शिवारात आंबे काढण्यासाठी आंब्याच्या झाडावर चढले होते.आंबे काढताना फांदी तुटल्याने त्यांचा झाडावरून पडुन मृत्यू झाल्याची घटना घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की,मेंढेगाळी गावचे सुपूत्र व पुण्यातील उद्योजक रवळनाथ नारायण गुरव हे नातेवाईकाच्या लग्नकार्यासाठी मेढेंगाळीला आले होते.
बुधवारी दि. ८ रोजी हलशी -भाबुर्डा परिसरातील शेतात आंबे काढण्यासाठी गेले होते. आंब्याच्या झाडावरून ते आंबे काढताना पायातील फांदी मोडल्याने ते झाडावरून खाली कोसळले .त्याच वेळी त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली .
लागलीच त्याना हलशी सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले.तेथून पुढील उपचारासाठी त्याना खानापूर सरकारी दवाखाण्यात पाठविण्यात आले.मात्र डोकीत रक्तस्त्राव झाल्याने त्याच्या मृत्यू झाला.
ते पुण्यातील शिवणे येथील उद्योजक आहेत.
नंदगड पोलिस स्थानकात घटनेची नोंद झाली असुन आज उत्तरणीय तपासणी करून मृृृत्यूदेह नातेवाईकांच्या ताब्यात देणात आला.
त्याच्या पश्चात पत्नी ,आई,मुलगा,मुलगी असा परिवार असुन मेंढेगाळीत त्यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.