
#कला,वाणिज्य,विज्ञान शाखाना प्रवेश सुरू!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या श्री स्वामी विवेकानंद इंग्रजी शाळेत सन २०२५ -२६ सालापासुन कला,वाणिज्य व सायन्स विभागाच्या पदवी पूर्व काॅलेजला प्रारंभ होत आहे. अशी माहिती संस्थेचे चेअरमन अँड चेतन मणेरीकर यानी शनिवारी दि.३ रोजी श्री स्वामी विवेकानंद इंग्रजी शाळेत बोलविलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.
यावेळी व्यासपिठावर सेक्रेटरी सुहास कुलकर्णी, संचालक गोविंद शाहपूरकर,सदानंद कपलेश्वरी,जयंत तिनेईकर, प्राचार्य पी.के. चापगांवकर तसेच मुख्याध्यापिका सौ.श्रध्दा पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्याध्यापिका सौ.श्रध्दा पाटील यानी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी बोलताना चेअरमन अँड.चेतन मणेरीकर म्हणाले की, सन १९८६ साली श्रीस्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना झाली.व श्री स्वामी विवेकानंद इंग्रजी शाळेची सुरूवात झाली.
खानापूरात त्यावेळी एकच इंग्रजी शाळा होती.त्यानंतर दुसरी इंग्रजी शाळा म्हणून श्री स्वामी विवेकानंद इंग्रजी शाळेचा नंबर लागतो. गेल्या कित्येक वर्षा पासुन श्रीस्वामी विवेकानंद इंग्रजी शाळेने विद्यार्थी घडविले आहेत.या शाळेचे विद्यार्थी देश विदेशा मोठ्या हुद्द्यावर कार्यरत आहेत.याचा मला सार्थ अभिमान वाटतो.
म्हणून यंदा सन २०२५-२६ सालापासुन श्री स्वामी विवेकानंद इंग्रजी शाळेच्या इमारतीत कला,वाणिज्य व सायन्स काॅलेजची सुरूवात होत असुन काॅलेजसाठी सुसज्ज इमारत ३६ लाख रूपयाच्या देणगीतुन उभारण्यात आली आहे. याशिवाय काॅलेजसाठी १२० डेक्स देणगी दाखल देण्यात आले आहेत. याजबरोबर काॅलेज विद्यार्थ्यासाठी मोफत करिअर मार्गदर्शन शिबीर, तसेच कँप्यूटर क्लासेसची सोय करण्यात येणार आहे.
तज्ञ प्राध्यापकांची नेमणूक करण्यात आली आहे.
तेव्हा तालुक्यातील ज्याविद्यार्थ्यानी ९० टक्क्यापेक्षा जास्त मार्क दहावी परीक्षेत घेतले आहेत.त्याना प्रवेशासाठी खास सवलत देण्यात येणार आहे. तेव्हा जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी प्रवेश घेऊन या संधीचा लाभ घ्यावा.असे आवाहन केले.
यावेळी सेक्रेटरी सुहास कुलकर्णी यानी ही आपले विचार व्यक्त केले.
आभार प्राचार्य पी.के.चापगांवकर यानी मानले.