
#सन १९८९ ते २०२४ पर्यतच्या विद्यार्थ्याचा सहभाग!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर ( सुहास पाटील )
तोपिनकट्टी ( ता. खानापूर ) येथील श्री महालक्ष्मी हायस्कूल शाळेच्या (सन १९८९ ते २०२४ ) पर्यतच्या माजी विद्यार्थ्याचा स्नेहमेळावा रविवार दि.४ मे रोजी सकाळी ९ वाजता शाळेच्या पटांगणात आयोजित करण्यात आला आहे.
या समारंभाचे उद्घाटन खानापुर तालुक्याचे आमदार विठ्ठल सोमाना हलगेकर यांच्याहस्ते होणार असुन .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भैरु यलापा शहापूरकर हे उपस्थित राहणार आहेत.
सकाळी ठीक ८.३० वाजता ग्रामदेवता श्री महालक्ष्मी मंदिर पासून समारंभ पूर्वक ग्रंथ दिंडीचा शुभारंभ होणार आहे.
कार्यक्रमाला बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी लीलावती एस हिरेमठ, खानापूरचे तहसीलदार दुंडाप्पा कोमार, खानापूर क्षेत्र शिक्षणाधिकारी पी रामाप्पा,सीपीआय लालसाब गवंडी आदीच्याहस्ते दीपप्रज्वलन करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक ए. डी .कांबळे र.भा.माडखोलकर महाविद्यालय चंदगड, हे उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक एम.एस .आरगु राहणार आहेत. सदर कार्यक्रम दोन सत्रात होणार आहे.