
#आमदाराच्याहस्ते लसीकरणाचा शुभारंभ!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील)
खानापूर शहरातील पशु दवाखाण्यात लसीकरणाचा कार्यक्रम शुक्रवारी दि. २मे रोजी पार पडला.
यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर यानी लस देऊन कार्यक्रमाचे उदघाटन केले.
प्रारंभी पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. ए.एस कोडगी यानी उपस्थिताचे स्वागत करून माहिती देताना म्हणाले की,तालुक्यात एकूण ८२,६७४ जनावरे असुन ४०,१३५ जनावरना त्वचा रोगावर लसीकरण तर ४२,५३९ जनावराना एफएमडी लसीकरण करण्यात येणार असुन ४५०० कुत्र्यासाठी
अँन्टीरॅबीस लसीकरण करण्यात येणार आहे.
या लसीकरणाची सुरूवात २६ एप्रिल पासुन ते ४ जुन पर्यत करण्यात येणार आहे.
तेव्हा तालुक्यातील शेतकरी बंधूनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा.असे आवाहन करण्यात आले.
प्रारंभी आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याहस्ते गोमातेचे पुजन करण्यात आले. यावेळी नगरसेवक लक्ष्मण मादार,नारायण ओगले, नगरसेविका मेघा कुंदरगी, लता पाटील ,सौ.सनदी आधी नगरसेवक उपस्थित होते.
यावेळी डाॅ.ए.बी.दादमी,डाॅ.यू सी होसुर,डाॅ. गंगाधर बाळेकट्टी,डाॅ.शकुंतला कागे,पी.बी.कोडबगी,आयाज अहमज,,आर.एन .सातगौडा,आक्षय मादीघर,हर्षद सौदत्ती व इतर कर्मचारी उपस्थित होते
प्रास्ताविक डाॅ.ए.बी.दादमी यानी केले.
तर आभार डाॅ.यू.सी.होसुर यानी मानले.