
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
वड्डेबैल ( ता.खानापूर ) येथील गावचे आराध्य दैवत श्री महालक्ष्मी माता मंदिराच्या इमारतीचे भूमिपूजन आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी आवरोळी मठाचे मठाधीश चेन्नबसव देवरू यांच्या दिव्य सान्निध्यात पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वड्डेबैल गावचे सुपुत्र राज्य शिवसेना उपाध्यक्ष के पी पाटील होते.
कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून अरविंद पाटील माजी आमदार, बेळगाव तालुका भाजपा प्रधान कार्यकर्ते मल्लाप्पा मारीहाळ ,माजी सभापती सयाजी पाटील ,मारुती चोपडे , राजीव पाटील, भरमानी पाटील, सहदेव बडगेर ,कल्लाप्पा पाटील ,सूर्याजी पाटील अरुण कडवी नागेंद्र पाटील तानाजी पाटील, पद्माना हरोगोप लक्ष्मण ठाकर, रामा पाटील, मारुती पाटील, बाळू पाटील, जायप्पा पाटील, कल्लाप्पाण्णा पाटील, महादेव ठाकर, नारायण जाबोटकर, यशवंत पाटील, राजू कडवी व गावातील समस्त नागरिक माता भगिनी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास पाटील यांनी केले तर प्रास्ताविक व स्वागत शांताराम कडवी यांनी केले .आभार प्रदर्शन नागेंद्र पाटील यांनी मानले.