
!माणिकवाडी क्राॅसवर दुचाकीची धडक!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
जटगे (ता.खानापूर ) येथील रहिवशी लक्ष्मी नारायण मळीक या रविवारी दि.२७ रोजी दुचाकीवर बसुन खानापूरला येत होत्या.माणिकवाडी क्राॅसवर त्याच्या दुचाकीला पाठीमागुन क्रमांक केए २२ एच एल ९२८१ या मोटर सायकल दुचाकीने जोराची धडक दिल्याने मागे बसलेल्या लक्ष्मी मळीक या पडल्याने त्याच्या डोकीला गंभीर दुखापत होऊन रक्त स्त्राव झाला. मात्र धडक दिलेला मोटर सायकलस्वार दुचाकीसह येथून पसार झाला. अद्याप त्याचा शोध नाही.
गंभीर जखमीना लागलीच खानापूर सरकारी दवाखान्यात दाखल केले.मात्र जास्त रक्तस्त्राव झाल्याने त्याना बेळगाव केएलई हाॅस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले.
मात्र सोमवारी उपचाराच्या दरम्यान त्यांचे निधन झाले.
या घटनेची नोंद खानापूर पोलिस स्थानकात झाली असुन पोलिस पुढील तपास करत आहेत.
त्यांच्या अंत्यविधी आज दुपारी जटगे येथे होणार आहेत.
जटगे येथील नारायण कृ मळीक याच्या त्या पत्नी होत. त्याच्या निधनाने जटगे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.