
#नागरीकांचे बैलूर ग्रा.पं.पी डी ओ व अध्यक्षाना निवेदन!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
कौलापूर (ता.खानापूर ) गावात नियमबाह्य हँटचेरी प्रोजेक्ट हे काम क्वाॅलिटी अँनिमल फिल्ड या कपंनीकडुन चालु आहे.
अनेक वेळा कौलापूर गावकर्यानी या बद्दल अक्षेप मांडुन तश्या तक्रारी बैलूर ग्राम पंचायतीकडे केल्या आहेत. प्रौडक्शन कंट्रोल बोर्डच्या नियमाचे उल्लघन करून कौलापूर गावापासुन केवळ १०० मीटर अंतरावर काम चालु आहे.तेेव्हा हे काम त्वरीत बंद करावे.अशी मागणी निवेदनाव्दारे केली आहे.
यावेळी बोलताना कौलापूरच्या लोपेश्वर देवस्थान कमिटीचे उपाध्यक्ष व काॅग्रेस नेते भैरू पाटील म्हणाले की,गावकर्याच्या आरोग्याचा विचार करून बैलूर ग्राम पंचायतीकुडन क्वाॅलिटी अँनिमल फिल्ड प्रा.लिमिटेड या कपंनीला गेल्या १५ वर्षात कोणताही परवाना दिला नाही.व तसा ठराव पास करून कौलापूर गावाला सहकार्य केले आहे. तसेच सहकार्य यापुढे ही राहुन क्वाॅलिटी अँनिमल फिल्ड प्रा.लिमिटेड कोणताही परवाना देऊ नये.असे यावेळी सांगीतले.
यावेळी निवेदनात म्हटले आहे की,कंपनीकडुन बैलूर ग्राम पंचायतीकडे ईस्टॅप बाॅन्ड पेपरवरती दिलेल्या नुसार जुने पोल्ट्री फाॅर्म मार्च २०२५ पर्यत बंद केले जाईल. परंतु आजुन बंद करण्यात आले नाही. तरी कृपया लवकरात लवकर पोल्ट्री फाॅर्म बंद करून सहकार्य करावे. अशी मागणी केली आहे.
निवेदन देताना कौलापूर लोपेश्वर देवस्थानचे अध्यक्ष गंगारम बावदाने ,उपाध्यक्ष व काॅग्रेस नेते भैरू पाटील, बैलूर ग्राम पंचायत सदस्या सौ .सखूबाई पाटील, सदस्य रामलिंग मोरे,लक्ष्मण बन्नार व सदस्या सौ गीता जांबोटी, तसेच बाबू बावदाने ,अप्पू शिंदे, वाघू पाटील ,भाघू गावडे व इतर नागरीक उपस्थित होते.
यावेळी बैलुर ग्राम पंचायतीचा अध्यक्षा सौ.
सावंत यानी निवेदनाचा स्विकार करून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.