
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
हलशी (ता.खानापूर ) गावचे रहिवाशी व ग्राम पंचायतीचे माजी सदस्य इर्शेत अंतोन फिगरे ( वय ५३) याचे दुचाकी वरील नियंत्रण सुटल्याने ते दुचाकीसह तलावात पडल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दि .६ रोजी उघडकीस आली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की इंर्शेत हे शनिवारी दि.४ रोजी हलशीवाडी येथे गेले होते.रात्री उशीरा ते परत येत असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने सरळ तलावात दुचाकीसह पडले असावेत असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गेले दोन दिवस ते घरी न परतल्याने त्यांच्या कुटूंबीयानी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला सोमवारी तब्बल तिसर्या दिवशी गोठण तलावात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह तरंगताना ये जा करणार्या नागरकीना दिसला.
लागलीच घटनेची माहिती नंदगड पोलिसाना कळविण्यात आली. पोलिसानी मृतदेह तलावाच्या बाहेर काढताच तो इंर्शेतचा असल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर तलावात दुचाकी ही आढळली. हलशीच्या माजी ग्राम पंचायत सदस्याचा तलावात पडुन मृत्यू झाल्याने हलशी गावात हळहळ व्यक्त होत आहे.