
#दोन्ही ही पदे सामान्य महिलासाठी!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर नगरपंचायतीच्या अध्यक्ष,उपाध्यक्ष निवडणुक २६ आँगष्ट रोजी होणार होती.मात्र नगरसेवक लक्ष्मण मादार यानी मागासवर्गीय आरक्षणावर अन्याय झाला असुन अध्यक्ष पद मागासवर्गीयासाठी एकदा ही राखीव आले नाहीत .यासाठी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपिठात याचिका दाखल केली होती.
त्यामुळे २६ आँगष्ट ते आज तागायत खानापूर नगरपंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पद निवडणूकीवर स्थगिती आसल्याने नगरसेवकातुन नाराजी पसरली होती.
नुकतीच सुनावणी झाल्यानंतर उच्च न्यायालयाने स्थगिती उठविली असुन पुन्हा खानापूर नगरसेवकातुन उत्साह संचारला आहे.
मागीलवेळी नगरसेवक प्रकाश बैलुरकर यानी आपली पत्नी नगरसेविका मिनाक्षी बैलुरकर याच्यासाठी खूप प्रयत्न केले होते.
पुन्हा खानापूर नगराध्यक्ष पदासाठी सामान्य महिला वर्गाची वर्णी लागल्याने पुन्हा चुरस होणार .अशी दाट शक्यता आहे.